Please enable JS

BLOG: Corona lockdown - a solution looking for a problem

From the CEO's desk

Corona lockdown - a solution looking for a problem

25th APR 2020

Hello Everyone!

I would like to bring to your notice the following points regarding the lockdown policy and implementation.

  • On one hand, saying don't crowd in shops, on the other hand, instead of the usual 12 to 16 hours, now keeping shops open only for 2 hours will certainly increase crowd at the shops, how will it get reduced? The simplest solution is to keep the store open for as long as possible, 24 hours if possible, and ensure that there is always ample supply and then develop a simple SMS based technology which will automatically give the requester a random slot through the server (without human intervention) e.g. You can go out on Monday 11 to 1, Wednesday 3 to 5, Friday 7 to 9. Police standing in the street will have the facility of automatic verification of this SMS.
  • At present, the most effective way to combat Corona is through human immunity. The proof is that 83% of Corona sufferers in Maharashtra do not show any symptoms. To maintain this immune system, fresh fruits, vegetables, milk, etc. should be abundant and supplied daily to everyone, especially where there is a high prevalence. Those who cannot afford these items should be provided them free of cost. But the reality is that all shops and deliveries, including essentials, are being closed. It is also important for a person to be happy in order to maintain a good immune system. Happiness is far from the people due to the bondage and fear of lockdown, on the contrary won't many lose the desire to live seeing these dead cities and dead villages?
  • If the experts say that lockdown can only slow down the rate of Corona proliferation by 20-25 percent during its peak, it means the proliferation will happen sooner or later. The purpose of lockdown is only to buy time to enable the health system, it cannot be a cure. So, if the health system has been enabled (to the extent possible for us) in the time bought so far, shouldn't we plan to lift the lockdown completely instead of tightening it further? Wouldn't it be a better strategy to allow herd immunity to develop as soon as possible? Doesn't lockdown interfere with herd immunity? Similar to Gabbarsingh's dialogue in Sholay, "Only one man can save you from Corona's anger - Corona himself". So-called green zones might be green because they have not been adequately tested, if life there can continue normally on the basis of immunity, then what is wrong if the same policy is followed everywhere?
  • No one in the world at the moment can say what percentage of the Corona spread was actually reduced due to the lockdown. But everyone can see the economic, social and mental crisis that has befallen everyone due to the lockdown. The basis on which the usefulness of lockdown is estimated is a theory. The reality is quite different. A true lockdown is not possible in today's human society, even more impossible in a country like India. Cases are increasing every day where there is lockdown, whereas cases are not increasing where there is no lockdown; which means lockdown doesn't make much difference to the Corona spread. However, the businesses and people are shut down while the Corona virus remains free. The world has noticed the biggest lockdown in India but Corona does not seem to have noticed it. Therefore, it is necessary to carry out a surgical strike, not a terrible cure like this lockdown. The decision-making task force should include not only doctors and financial experts but also ordinary people, industrialists, small business owners and workers so that the holistic thinking happens and a practical way is found.
  • In India, an average of 26,000 people die every day, so how big really is the Corona crisis? In a country like India, wouldn't the crisis of lockdown be bigger than that? To understand the exact number of infected people, we have to test everyone and maybe every few days, which is not possible. In Italy, when the outbreak of Corona was at its peak, testing all of the residents in one city revealed that 3% of the population was infected. Based on this, about 4 crore people in India could be infected. According to point no. 2 above, if 1% of them became critical and unfortunately died, the number would be 4 lakh. Assuming this happens in about 3 months, still this figure is much lower than the usual mortality rate (26 thousand x 90 days = 23.4 lakh). Also among these 4 lakh, the ones who died due to Corona alone and had no other illnesses - such cases will be very less. Knowing that this arithmetic cannot be done in such a simple way, it would still be more appropriate than the frightening reality of lockdown and the available options.
  • Since it is not possible to test all of them frequently and many deaths are still happening outside the hospitals today, no one knows exactly how many people are infected and how many died due to Corona. In order to provide accurate statistics, sewage testing is being carried out in developed countries to estimate the number of infected people in a particular area. We can also estimate this wherever possible and then comparing the usual mortality rate with current mortality rate during the same period of the year could give us an estimate of deaths due to Corona. Of course, public life has to be restored first, otherwise the reduced number of deaths during lockdown due to reduced road accidents and many other causes will cause errors in the calculation. Or more accurate predictions can be made even today by considering factors like accidents etc. in this formula. From such an estimate then the necessary measures can be taken in a way that is better and really useful in the area where it is needed.
  • With all the attention being paid to the Corona alone, the number of deaths from other diseases has skyrocketed. Some say the increase is more than the number of deaths caused by Corona. Private clinics are closed in the lockdown, hospitals are reserved for Corona, therefore other ailments are not being treated in time. Not only that, the lockdown also delays the patient's arrival at the hospital. In China, where the current lockdown originates, the government is used to surveillance and imposing restrictions on citizens. They have developed the necessary capabilities for that. Citizens are also accustomed to a lot of government restrictions. Hence it would have probably been possible to shut down a city there and get the expected results. But it should also be kept in mind that other countries might not be able to get the results by blindly imitating them. Every time when man made a mistake by interfering with nature, it created bigger problems. Can Corona be seen as cycle of nature and not a disaster?
  • Along with death, the DALYs, meaning "years of life wasted due to illness" should also be considered. Roughly speaking, if 130 crore people in India were not able to live a normal life for a month, it would be equivalent to wasting about 15.5 lakh lives.
  • Most of the residential complexes have banned entry to the domestic workers, cooks etc. For many, those services are essential, yet it has not been considered. As a result, both, those who need these services and lakhs of domestic workers, are starving. (Further, the feeling of going to the hometown as there is no work left for them in the cities, has increased among these housemaids and their families.) On the other hand, in direct violation of the government's order, the residents of the complexes jog, gather and so on and children play in the complex's premise, every morning and evening. Will the government solve this entanglement of self-proclaimed housing society regime's Talibani rules created out of the natural selfishness of humans?
  • Corona will leave today or tomorrow but it will take longer for fear of Corona to go away. When and how will the businesses be streamlined by bringing back those who went to the village due to bad experience during lockdown or those who will go after the lockdown? Corona infected and cured are being outcasted. If so many problems have arisen due to the Corona bugaboo, how many of them can the government solve?
  • We have a retirement age of 58-60 years. Most of the people working in the industry are young who are at low risk of Corona. If they take proper care when entering the house after going home from work and pay close attention to the health of the elderly in the house, the life can be restored immediately with a controlled death toll. Even today the police or many other people who are working outside are living by taking the same precautions, so how can it be assumed that it will not be possible for others?
  • On one hand, consumers are not getting fruits and vegetables, while on the other hand, farmers are having to bury standing crops. Farmers who are already suffering, now have lost all their current crops and are contemplating whether to take the next crop or not. This will lead to shortage of supply as well as there will be demand for financial assistance to farmers. Demands for help from sunken industries and workers will come forward. Since all sources of revenue are closed, how will the government get all these out of the financial pit? Lockdown has started a vicious cycle.
  • Considering the real public welfare and scientific way, rather than political inevitability, the lockdown needs to be ended immediately and public life needs to be restored. It is not possible for anyone to meet the current conditions for resumption of business, so everything has to be restored without any conditions. You have to believe that people are wise enough to take care of themselves. Though some of the decisions made previously in the country seemed appropriate at first, after realizing the consequences, most agreed that they were wrong. The same is likely to happen in the case of lockdown. In fact, it seems that this is the last blow to the Indian economy and the masses. The confusion and coercion in the implementation of the lockdown has also led to growing public anger at the administration and thereby the government. Overall, it won't be wrong if we say - the lockdown is a solution looking for a problem.

Thank you!

MORE BLOG TOPICS

कोरोना लॉकडाउन - समस्येच्या शोधात असणारा तोडगा

२५ एप्रिल २०२०

नमस्कार!

किचकट होत चाललेल्या लॉकडाऊन धोरण आणि अंमलबजावणीबाबत खालील काही मुद्दे आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो.

  • दुकानांमध्ये गर्दी करू नका असं एकीकडे सांगताना दुसरीकडे दुकानांची वेळ एरवीच्या १२ ते १६ तासांऐवजी आता केवळ २ तास करण्याने गर्दी वाढणारच, ती कमी कशी होईल? यासाठी अगदी सोपा उपाय म्हणजे दुकानं अधिकाधिक काळ, दुकानदारांना शक्य आल्यास २४ तासही, उघडी ठेऊन त्यामध्ये मुबलक पुरवठा सदा सर्वकाळ राहील याची दक्षता घेणं आणि मग एक साधी एसएमएस बेस्ड टेक्नॉलॉजी बनवून विनंती करणाऱ्याला सर्व्हर द्वारे ऑटोमॅटिकली (मानवी हस्तक्षेपाशिवाय) रँडम स्लॉट मिळणं उदा: सोमवारी ११ ते १, बुधवारी ३ ते ५, शुक्रवारी ७ ते ९ तुम्ही घराबाहेर पडू शकता. रस्त्यात उभ्या पोलिसांना या मेसेजची ऑटोमॅटिकली सत्यापन करण्याची सोय असेल.
  • कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सध्यातरी सर्वात प्रवाभी ठरू शकेल ती म्हणजे माणसाची रोगप्रतिकार शक्ती. याचं लक्षण म्हणजे महाराष्ट्रातील ८३% कोरोनाबाधितांना कोणतीही लक्षणं न आढळणे. ही रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवण्यासाठी ताजी फळे, भाजीपाला, दूध इ सर्व वस्तूंचा मुबलक आणि दररोज प्रत्येकाला, विशेषतः जिथं जास्त प्रादुर्भाव आहे तिथं पुरवठा व्हायला हवा. ज्यांना या वस्तू परवडत नसतील त्यांना त्या मोफत पुरवायला हव्यात. परंतु प्रत्यक्षात मात्र याउलट म्हणजे जीवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकाने आणि डिलिव्हरीज बंद करण्यात येत आहेत. रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवण्यासाठी माणसाचं आनंदी राहणं देखील आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या बंधनामुळे आणि भीतीमुळे आनंदी राहणं दूर उलट मरणासन्न शहरं आणि गावं पाहून काही माणसांची जगण्याची इच्छाच संपून जाणार नाही का?
  • जर तज्ज्ञांचंच म्हणणं असेल कि लॉकडाऊन फार फार तर कोरोना प्रसाराचा वेग २०-२५ टक्क्यांनी कमी करू शकतो, प्रसार आज ना उद्या होईलच. तर मग मिळालेल्या वेळात आरोग्य यंत्रणा सक्षम झाल्या असतील तर आता आणखी कडक लॉकडाऊन करण्याचं नव्हे तर ते संपूर्णपणे उठवण्याचं नियोजन करायला नको का? हर्ड इम्युनिटी लवकरात लवकर विकसित होऊ देणं हे अधिक चांगलं धोरण नसेल का? लॉकडाऊन या हर्ड इम्यूनिटीच्या आड येत नाहीये का? शोले मधील गब्बरसिंगच्या डायलॉग प्रमाणे "कोरोना के ताप से तुम्हे सिर्फ एक ही आदमी बचा सकता है - खुद कोरोना" असंच म्हणावं लागेल. सो कॉल्ड ग्रीन झोन्स पुरेश्या टेस्ट्स केल्या नसल्याने ग्रीन असावेत, तिथे इम्युनिटी-भरोसेच जनजीवन सुरळीत सुरु असेल तर मग सगळीकडे हेच धोरण अवलंबल्यास काय वाईट?
  • मृत्यू सोबतच DALYs म्हणजेच "आजारपणामुळे वाया जाणारी आयुष्याची वर्ष" हा देखील मुद्दा विचारात घ्यायला हवा. ढोबळ मानाने बोलायचं झाल्यास भारतातील १३० कोटी लोकांचा सरासरी एक महिना सामान्य आयुष्य जगता न आल्याने संपूर्णपणे वाया गेल्यास ते जवळपास १५.५ लाख आयुष्ये वाया गेल्यासारखं आहे.
  • भारतात दररोज सरासरी २६ हजार लोकं एरवीही मृत्युमुखी पडतात, अश्यात हे कोरोनाचं संकट खरंच किती मोठं आहे? भारतासारख्या देशात लॉकडाऊनचं संकट त्याहून मोठं नसेल का? कोरोनाग्रस्तांचा नेमका आकडा समजण्यासाठी सरसकट सर्वांची आणि कदाचित दर काही दिवसांनी टेस्ट करावी लागेल, जे आपल्याकडे शक्य नाही. इटली मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव शिखरावर असताना एका शहरात अशी सर्वांची टेस्ट केल्यावर तिथले ३% नागरिक बाधित असल्याचं समोर आलं. त्याआधारे बोलायचं झाल्यास भारतात साधारण ४ कोटी लोकांना याची लागण होऊ शकेल. वरील क्र. २ नुसार त्यातले १% गंभीर झाले आणि दुर्दैवाने मृत्युमुखी पडले तर त्यांची संख्या ४ लाख असेल. साधारण ३ महिन्यांच्या काळात असं घडेल असं गृहीत धरल्यास एरवीच्या मृत्युदराच्या (२६ हजार x ९० दिवस = २३.४ लाख) तुलनेत हा आकडा बराच कमी आहे. तसेच या मृत्युमुखी पडलेल्यांपैकी इतर कोणताच आजार नव्हता पण फक्त कोरोनामुळे दगावले असे खूपच कमी असतील. ही आकडेमोड अगदी इतक्या सोप्या तऱ्हेने ढोबळमानाने करता येणार नाही हे माहित असूनही लॉकडाऊनच्या भयावह वास्तवापेक्षा आणि उपलब्ध पर्यायांत ती योग्यच ठरेल.
  • सर्वांची टेस्ट वारंवार करणं शक्य नसल्याने आणि अनेक मृत्यू आजही हॉस्पिटलच्या बाहेर होत असताना नेमके किती लोक बाधित आहेत आणि किती कोरोनामुळे दगावले हे कुणालाच माहित नाही. आकडेवारीचा व्यवस्थित अंदाज वर्तवायचा असल्यास प्रगत देशांमध्ये सांडपाण्याचं टेस्टिंग करून त्या भागात किती जणांना लागण झालेली असू शकते याचे अंदाज काढले जात आहेत. असा अंदाज शक्य आहे तिथे तिथे आपणही काढून मग एरवीच्या मृत्युदराच्या तुलनेत सध्याचा त्याच कालावधीतला मृत्युदर किती आहे, या आकडेवारीवरून कोरोनामुळे किती मृत्यू होताहेत याचा अंदाज लावता येऊ शकतो. अर्थात यासाठी जनजीवन आधी पूर्ववपदावर आणावे लागेल, अन्यथा लॉकडाऊन मुळे रस्ते अपघात आणि इतर अनेक कारणांमुळे होणारे मृत्यू कमी झाल्याने असा अंदाज चुकू शकेल. किंवा अपघात वगैरे फॅक्टर्स या सूत्रात पकडून अधिक अचूक अंदाज आजही काढता येईल. अश्या अंदाजातून मग आवश्यक त्या उपाययोजना आवश्यक त्या भागात अधिक चांगल्या प्रकारे आणि खरोखर उपयुक्त ठरतील अश्या पद्धतीने करता येतील.
  • बहुतेक निवासी संकुलांनी घरकामगार, स्वयंपाकी इ. ना प्रवेश बंद केलेत. खूप साऱ्या जणांसाठी त्या सेवा जीवनावश्यक आहेत, तरीही त्यांचा विचार केला गेलेला नाही. त्यामुळे या सेवांची गरज असणारे आणि लाखो घरकामगार अश्या दोघांचीही उपासमार होत आहे. (त्यातून मग कामं बंद झालीत गावाकडे चला अशी भावना या घरकामगार महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये वाढलीये.) याउलट शासनाच्या आदेशाचा सरळ सरळ भंग करून दररोज सकाळ संध्याकाळ या संकुलांच्या आवारात येथील रहिवासी, लहान मुले एकत्र खेळतात, जॉगिंग वगैरे करतात. माणसाच्या नैसर्गिक स्वार्थीपणातून निर्माण झालेल्या स्वयंघोषित सोसायटी राजवटीच्या तालिबानी नियमांचा हा गुंता शासन सोडवणार का?
  • कोरोना आज ना उद्या जाईल पण कोरोनाची भीती जायला अधिक काळ लागेल. लॉकडाऊन मधील वाईट अनुभवाने गावाकडे गेलेल्या किंवा लॉकडाऊन संपल्यानंतर जाणाऱ्यांना परत शहरांमध्ये आणून उद्योगधंदे कधी आणि कसे सुरळीत होणार? कोरोना बाधित आणि बरे झालेल्यांना बहिष्कृत करण्याचं प्रमाण वाढलंय. अश्या असंख्य समस्या कोरोनाचा बागलबुआ झाल्याने निर्माण झाल्यात, त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी शासन कुठे कुठे पुरं पडणार?
  • आपल्याकडे निवृत्तीचं वय ५८ - ६० वर्षे आहे. उद्योगांमध्ये कार्यरत असणारे बहुतेक तरुण आहेत, ज्यांना कोरोनाचा धोका कमी आहे. त्यांनी कामावरून घरी गेल्यावर घरात प्रवेश करताना व्यवस्थित काळजी घेतली आणि घरातील वृद्धांच्या आरोग्याकडे बारीक लक्ष ठेवलं तर जीवितहानी बऱ्यापैकी नियंत्रणात ठेऊन जनजीवन देखील आत्ता लगेच पूर्वपदावर आणता येऊ शकतं. आजही पोलीस किंवा इतर असंख्य लोक जे बाहेर काम करत आहेत ते देखील अश्याच पद्धतीने काळजी घेऊन जगताहेत, तर मग इतरांना ते शक्य होणार नाही असं कसं गृहीत धरता येईल?
  • एकीकडं ग्राहकांना फळे, भाज्या मिळत नाहीत तर दुसरीकडे शेतकऱ्यांना उभी पिकं गाडून टाकावी लागत आहेत. आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांचं यंदाचं सगळं पीक वाया गेलं आणि पुढचं पीक घ्यावं कि नाही या विवंचनेत ते आहेत. त्यातून पुढे पुरवठ्याचा तुटवडा निर्माण होण्याबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिक मदत करण्याची मागणीदेखील पुढे येईल. बुडालेल्या उद्योगधंद्यांची आणि कामगारांची मदतीची मागणी पुढे येईल. महसुलाचे सर्व स्रोत बंद असल्याने सरकार या सर्वांना आर्थिक गर्तेतून बाहेर काढणार कसं? लॉकडाऊन मुळे एका मोठ्या दुष्ट्चक्राला सुरुवात झालीय.
  • राजकीय अपरिहार्यतेपेक्षा खरा लोककल्याणाचा आणि शास्त्रीय मार्ग अवलंबून लॉकडाऊन तातडीने संपवणे आणि जनजीवन पूर्वपदावर आणणे गरजेचे आहे. उद्योगधंदे पुन्हा सुरु करण्यासाठी सध्या टाकलेल्या अटी कुणालाही पूर्ण करणं शक्य नाही, त्यामुळे तश्या कोणत्याही अटी न टाकता सारंकाही पूर्वपदावर आणावं लागेल. स्वतःची काळजी घेण्याइतपत लोकं शहाणी आहेत यावर विश्वास ठेवावा लागेल. निव्वळ इतिहासात स्वतःच नाव कोरण्याच्या नादापायी देशात यापूर्वीदेखील घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा मोठा फटका सर्वांना बसलाय. अश्याच एका आर्थिक निर्णयाच्या समर्थनार्थ अमुक इतके दिवस मला द्या आणि सर्वांचं मी भलं करतो, अशी आश्वासनं दिली गेली. सुरुवातीला लोकांना वाटलं यातून आपलं भलं होणार आहे म्हणून त्या निर्णयाला सर्वांनी पाठींबा दिला. पण नंतर समोर आलेल्या आकडेवारी आणि प्रत्यक्ष बसलेल्या झळा सोसताना बहुतेकांना तो निर्णय चुकीचा असल्याचं पटलंय. लॉकडाऊन बाबतीतही असंच होण्याची शक्यता वाढलीये. किंबहुना भारतीय अर्थव्यवस्थेच्या आणि जनसामान्यांच्या पेकाटात घातलेला हा शेवटचा दणका ठरतोय कि काय असं वाटू लागलंय. लॉकडाऊन अंमलबजावणीतील गोंधळामुळे आणि सक्तीमुळे लोकांचाही रोष प्रशासन आणि पर्यायाने शासनावर वाढू लागलाय. एकंदरीत, लॉकडाऊन म्हणजे समस्येच्या शोधात असणारा तोडगा आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

धन्यवाद!

आणखी ब्लॉग्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा